राहिलेला भास
तुझे ते गोंदण
क्षितीजाची खुण
मनाचे प्रवास
कशी दाट सय
आठवांचे गुज
ओलावली निज
अनवट भय
आनंदाच्या वेशी
तुझ्या अंगणात
तेथे माझी वाट
सावळल्या देशी
मृगाच्या सरींचा
तुझा एक सर
माझा अडसर
आस भिजण्याची
ओलावले नाही
माझे वृंदावन
सौभाग्याचे वाण
वठलेले काही
एकदा सोहळा
जाहला प्रेमाचा
दुभंगला साचा
श्वासही मोकळा
तुझे ते गोंदण
क्षितीजाची खुण
मनाचे प्रवास
कशी दाट सय
आठवांचे गुज
ओलावली निज
अनवट भय
आनंदाच्या वेशी
तुझ्या अंगणात
तेथे माझी वाट
सावळल्या देशी
मृगाच्या सरींचा
तुझा एक सर
माझा अडसर
आस भिजण्याची
ओलावले नाही
माझे वृंदावन
सौभाग्याचे वाण
वठलेले काही
एकदा सोहळा
जाहला प्रेमाचा
दुभंगला साचा
श्वासही मोकळा
No comments:
Post a Comment