Tuesday, 3 June 2014

फुलपाखरु

फुलपाखरं पावसात कशी भिजतात गं?
थेंब उरी घेउन कशी निजतात गं?

दाटुन येतं मनात काही, मनात हसतात गं
हसली नाही तरी तुझे भास दिसतात गं

रानोरानी ओल पिऊन काय गातात गं?
डोळ्यांत गाढ निज, कुठे दूर जतात गं?

फुलपाखरु गाली तुझ्या गोड दिसतं गं
ओंजळ माझी वेडी, त्यात कधीच नसतं गं

खुप जपून, लपून माझ्या डोळ्यांत बसतं गं
त्याला फूल फक्त तुझ्या दिठीत दिसतं गं


No comments:

Post a Comment