Tuesday, 20 May 2014

भास

पुन्हा पावलांचे तुझ्या भास व्हावे
अशा सांजवेळी तुला आठवावे

ऋतु सांजवेडा निशेने झुरावे
मला चंद्र नाही तुला आठवावे

कळी लाजूनी चुंबता चूर व्हावी
जणू लाजरी स्पर्शुनी तू मिटावे

आता सांज झाली कुणी दूर नाही
तुझी गाज लाटांत, हरवून जावे

कुणा पाखरांच्या शीळा जीवघेण्या
तुझे नाव त्यांना कसे काय ठावे

तुला थांबता सावली ना किनारी
तरी ते शराबी तुझे भास व्हावे






No comments:

Post a Comment