Wednesday, 14 May 2014

काजळ रेषा

डोळ्यांत तुझ्या काही अर्थ काही संवाद
डोळ्यांत तुझ्या
होकार, काही नकार

डोळ्यांत तुझ्या टिपूर चांदणं
काही संकेत

ते हसणं, ते लाजणं
सारं काही
डोळ्यांत तुझ्या

तुझ्या डोळ्यांत
तेच व्याकुळ स्वर
तिच घट्ट मिठी
आणि.... गर्द काजळ रेषा

No comments:

Post a Comment