Thursday, 15 May 2014

अबोल

दिवा चांदवा, चांदण्या सांजवाती
कुणी लावल्या धुंद एकांत राती

किती अर्थ नि:शब्द कळी मोगऱ्याची                 सुगंधून लाजुन मिठी सावळ्याची

तुला भाव शब्दांत कळणार नाही
श्वासांत घे चांदणे, छंद काही 

मुके गीत भावे तुला मिलनाचे
मला ते उखाणे कळणार नाही

No comments:

Post a Comment