Friday, 16 May 2014

रुसवा

रुसलात का स्वरांनो रुसलात आसवांनो
रुसली सखी म्हणुनी रुसलात आठवांनो

थिजला म्हणून श्वास
दुखणे तसेच आहे
आक्रंदने निमाली
रडतो अजुन आहे

शब्दांत राहिलेली स्वप्ने नकाच गाऊ
रुसवा तिचा जुना हा रुसलात का स्वरांनो

अलवार प्रेम माझे
नाही तिला कळाले
हसरे उगाच काही
व्रण अंतरी मिळाले

आता असेच गाणे, आलाप काहुरांचा
भिजलाच श्वास नाही, रुसलात आसवांनो


No comments:

Post a Comment