Thursday, 15 May 2014

अखेर

मी एकटेच अन् हे माझे अबोल गाणे
आता क्षणात सारे इतके उरुन जाणे

घनदाट अंतरी जे काही तरुण आहे
ती एक त्या दिसांची इतकीच खूण आहे

कोठेच शोधवेना तुज आठवांमध्येही
निमिषांत संपणाऱ्या जखमा उरात नाही

मी शांत स्पंदनांची गणिते हजार केली
शून्यात बाकी येण्या शून्ये हजार झाली

एखाद रात्र माझी इतकी उदार व्हावी
माझ्यात आसवे ही नुरता विरुन जावी

No comments:

Post a Comment