तुझ्यातुन माझे हसू बोललेले
जसे शीत मृद्गंध पाणावलेले
मला शांत पानांत छळती किनारे
तुझ्या पावलांचे सडे शिंपलेले
किती संथ धारा पुसती किनारा
त्या नक्षीचेही मन भारलेले
आता ते किनारे हळूवार झाले
पुन्हा त्या घनांतून जल दाटलेले
जसे शीत मृद्गंध पाणावलेले
मला शांत पानांत छळती किनारे
तुझ्या पावलांचे सडे शिंपलेले
किती संथ धारा पुसती किनारा
त्या नक्षीचेही मन भारलेले
आता ते किनारे हळूवार झाले
पुन्हा त्या घनांतून जल दाटलेले
No comments:
Post a Comment