नकळत सर झरावी
बेभान सरी कोसळाव्यात....
तुझ्या आठवणींसारख्या
आणि सगळं काही धुसर व्हावं
पाण्यातील आभाळासारखं
मी थिजलेला
तिथेच
काठावरती
रात्र अगदी आतुन दाटलेली
रातकिड्यांच्या आवाजात भिजून पिसाट वारा
क्षणात त्यावर स्वैर व्हावं
पण तरीही तु कुठेच नसशील....
मी कुठेतरी माझ्यातच हरवत जाईन
मी भिजेन..
असाच...
पुन्हा पुन्हा
आता पाऊसही झरुन संपला
तरीही वाटतं आभाळ दाटून यावं
सरींमागून सरी झराव्यात
रात्र भिजावी
आणि शब्दांतून.. मी
हे सारं दोन ॠतुंनंतर
आता फक्त मन भरुन यावं
मी वहावं....
दाटून....
बेभान सरी कोसळाव्यात....
तुझ्या आठवणींसारख्या
आणि सगळं काही धुसर व्हावं
पाण्यातील आभाळासारखं
मी थिजलेला
तिथेच
काठावरती
रात्र अगदी आतुन दाटलेली
रातकिड्यांच्या आवाजात भिजून पिसाट वारा
क्षणात त्यावर स्वैर व्हावं
पण तरीही तु कुठेच नसशील....
मी कुठेतरी माझ्यातच हरवत जाईन
मी भिजेन..
असाच...
पुन्हा पुन्हा
आता पाऊसही झरुन संपला
तरीही वाटतं आभाळ दाटून यावं
सरींमागून सरी झराव्यात
रात्र भिजावी
आणि शब्दांतून.. मी
हे सारं दोन ॠतुंनंतर
आता फक्त मन भरुन यावं
मी वहावं....
दाटून....
No comments:
Post a Comment