नयनी अनुवाद तुझ्या कितीक शब्दांचे
बंध बावऱ्या जीवास जणू बेधुंद श्रावणांचे
तुझ्या लाटांत केसांच्या
गुलाबी रुंजतो वारा
किनारी काय शोधू मी ठसे माझ्याच श्वासांचे
सये तू चित्र शब्दांचे
कविता मला न सुचलेली
सये तू चांदवा माझा
सये तू रात्र सजलेली
सये तू सांज ना माझी
सरींवाचून भिजलेली
सये तू सावली माझी
मला बिलगून निजलेली
Kya baat h
ReplyDeleteThanks manas.
ReplyDelete