तुज, सांज पाहताना
होतो अबोल वारा
किरणांस ही नव्हाळी
हा केशरी किनारा
सायास स्पंदनांचे
चुकता हिशेब सारे
ती कोवळी लकेर
उच्छ्वास लांबणारे
शब्दांस या गीतांच्या
हॄदयी तुझ्या विसावे
भवगंध आठवांचे
स्वरचंदनी भिजावे
होतो अबोल वारा
किरणांस ही नव्हाळी
हा केशरी किनारा
सायास स्पंदनांचे
चुकता हिशेब सारे
ती कोवळी लकेर
उच्छ्वास लांबणारे
शब्दांस या गीतांच्या
हॄदयी तुझ्या विसावे
भवगंध आठवांचे
स्वरचंदनी भिजावे
Mazi aawdti kvita...:)
ReplyDeleteThanks dear. And yes one of my favorites too.
ReplyDelete